सुखदुःखांचिया कोडी ।
1540.
सुखदुःखांचिया कोडी । संतदरुशनें तोडी बेडी ॥१॥
थोर मायेचा खटाटोप । संतदरुशनें नुरे ताप ॥२॥
चार देहांची पै वार्ता । संतदरुशनें तुटे तत्त्वता ॥३॥
एका जनार्दनी संत । सबाह्म अभ्यंतर देहातीत ॥४॥