वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

गंगा आली आम्हावरी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080024 · अभंग क्र. १५४४

1544.
गंगा आली आम्हावरी । संतपाउले साजिरी ॥१॥
तेथे करीन अंघोळी । उडे चरणरज धुळी ।
येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥धृपद॥
पाप पळाले जळाले । भवदुःख दुरावले ॥२॥
तुका म्हणे धन्य जालो । संतसागरी न्हालो ॥३॥

अर्थ :
संतांची साजिरी पाऊले म्हणजे गंगा रूप आहेत आणि ती आमच्या जवळ सहजच आले आहेत. ज्या ठिकाणी संतांच्या चरणाची धूळ उडत असते तेथे जाऊन त्या धुळीने मी स्नान करीन. संता जवळ, त्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ व सर्व पर्वकाळ येतात. मी संतांच्या चरणी धुळीने स्नान केले त्यामुळे माझे सर्व पाप पळाले नुसते पळाले नाही तर जळाले सुद्धा व जन्ममरणाचे दुःख नाहीसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी आज धन्य झालो कारण आज संत सागरामध्ये मी स्नान केले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग