जीवन्मुक्त केले नामा
1541.
जीवन्मुक्त केले नामाचे गजरी सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥
काये उतराई होऊ तुज देवा | उदारा केशवा मायबापा ॥२॥
अंतरी देऊनि प्रेमाचा जिव्हाळा | मुक्तीचा सोहळा भोगविसी |॥३॥
नामा म्हणे वेदा न येसी अनुमाना | वर्णिता पुराणा पडले टक |॥४॥
