वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

मीच विखळ मीच विखळ ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080178 · अभंग क्र. १५२९

1529.
मीच विखळ मीच विखळ । येर सकळ बहु बरे ॥१॥
पाहिजे हे क्षमा केले । येणे बोले विनवणी ॥धृपद॥
मीच माझे मीच माझे । जाले ओझे अन्याय ॥२॥
आधी आंचवला आधी आंचवला । तुका जाला निर्मनुष्य ॥३॥

अर्थ :
जगामध्ये मलाच माझ्या मीपणाचा अभिमान आहे बाकी सर्व चांगले आहेत. देवा या दोषाबद्दल तुम्ही मला क्षमा केले पाहिजे हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक बोलत आहे. देवा " मी आणि माझे " असे म्हणणे यातच मी अपराध करत आहे. परंतु या अज्ञानामुळेच मला ओझे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संसाराविषयी आचवल आहे, आसक्त झालो आहे त्यामुळे पशुवत निर्मनुष्य झालो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग