आपणा दाउनी भुरळे केल
1529.
आपणा दाउनी भुरळे केले ।
ठकुनि माझे मीपण नेले ॥१॥
आता जाऊ कोणीकडे ।
पळो तरी तो मागे पुढे ॥२॥
धावा म्हणोनि बोलो जाय ।
तव बोलाते गिळूनी आपणाचि ठाये ॥३॥
ऐको जाय याच्या गोठी ।
तव तो शब्दा पाठी पोटी ॥४॥
देखो जाता देखणेंचि होय ।
दृश्यादृश्य हा नुरवीचि माये ॥५॥
सुगंध घेता आपणचि नाक ।
गंधाचा गंध हाचि हा एक ॥६॥
मी माझे मज न दिसेची कोठे ।
बहुता जुगांचे हरिले सांठे ॥७॥
ठकूनिया निळा अवघाचि नेला ।
सकळही त्याचे आपणचि झाला ॥८॥
