उपरम झाला सर्वकाळ इं
1522.
उपरम झाला सर्वकाळ इंद्रिया ।
स्वरुपी विलया मन गेले ॥१॥
ऐशिया स्वानंदे बुझाविले चित्त ।
राहिली अचिंत वदनी वाचा ॥२॥
अष्ट अविर्भाव डवरले अंगी ।
प्राणी प्राणरंगी निजवासे ॥३॥
त्रयबंध ठसा पडिला शरीरा ।
वृत्ति गेली घरा निजाचिया ॥४॥
निमोनिया गेले शब्दाचे बोलणे ।
पवनचि प्राणे शोषियेला ॥५॥
निळा सुखासुखी पावला विश्रांती ।
पद पिंडा समाप्ति करुनिया ॥६॥
