उडाली पक्षिणी गेली अ
1527.
उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवूनिया ॥१॥
तसे माझे मन राहो का ईश्वरी | मग सुखे संसारी असेना का ॥२॥
धेनु चरे वनी वच्छ असे घरी चित्त बच्छावरी ठेवुनि फिरे ॥२॥
दुडीवरी दुडी सखिसी गोष्टी करी | चित्त दुडीवरी ठेवूनिया ॥४॥
विष्णुदास नामा विनवी परोपरी | हे प्रेम श्रीहरी द्यावे मज ॥५॥
