संतसंगे तरला वाल्हा
1534.
संतसंगे तरला वाल्हा । पशु तरला गजेंद्र ॥१॥
ऐसा संतसमागम । धरता उत्तम सुखलाभ ॥२॥
तुटती जन्मजरा व्याधी । आणिक उपाधी नातळती ॥३॥
संसाराचा तुटे कंद । नरसे भेद अंतरीचा ॥४॥
परमार्थाचे फळ ये हाता । हा जोडता संतसंग ॥५॥
घडती तीर्थादिक सर्व । सकळ पर्व साधतीं ॥६॥
एका जनार्दनी संत । धन्य समर्थ तिही लोकी ॥७॥
