व्यापकापरीस मन केले
1539.
व्यापकापरीस मन केले बाड | सांपडले गोड प्रेमसुख ॥१॥
जिकडे पाहे तिकडे विदुल अवधा | भीमा चंद्रभागा पुंडलिक ॥२॥
सर्व निरंतरी सबाह्य अंतरी | हे ब्रह्मांड पंढरी जाली मज ॥३॥
महरले तरुवर पुष्पो फलो भार | तेंचि निर्विकार सनकादिक ॥४॥
आवडीचा आनंदु तोचि विष्णुनादु अनुभव तो गोबिंदु गोपवेषे ॥५॥
नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा मार्गे पुढे उभा सांभाळित ॥६॥
