तोचि ब्रम्हविद जाण ।
1535.
तोचि ब्रम्हविद जाण ।
परब्रहमी वृत्ति लीन ॥१॥
व्दैताव्दैत मावळले ।
पूर्णब्रम्ह अनुभविले ॥२॥
जन वन ते समान ।
मन झाले पै उन्मन ॥३॥
निळा म्हणे त्यांच्या नांवे ।
दोष नाशती स्वभावे ॥४॥
1535.
तोचि ब्रम्हविद जाण ।
परब्रहमी वृत्ति लीन ॥१॥
व्दैताव्दैत मावळले ।
पूर्णब्रम्ह अनुभविले ॥२॥
जन वन ते समान ।
मन झाले पै उन्मन ॥३॥
निळा म्हणे त्यांच्या नांवे ।
दोष नाशती स्वभावे ॥४॥