वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

टाळ दिंडी हाती उभा म

🙏 4. संत नामदेव · ABH-082821 · अभंग क्र. १५३१

1531.
टाळ दिंडी हाती उभा महाद्वारो | नामा कीर्तन करी पंढरिये ॥१॥
आवडीचेनि सुखे वोसंडतु प्रेमे गातो मनोधमे हरिचे गुण ॥२॥
सांडोनि अभिमान नाचे धरोनि कान | अंतरी ध्यान विठोबाचे ॥३॥
श्रीहरिची उत्तम जन्मकर्मनामे | घेतली त्या प्रेमे सुखरूपे ॥४॥
संतांची विश्रांति ज्ञानियांचे गुज | जे का मुक्तिबीज मोक्षदानी ॥५॥
कृष्ण विष्णु हरी मुकुंद मुरारी | अच्युता नरहरी नारायणा ॥६॥
गोवर्धनधरे गोपीमनोहरे | भक्तकरुणाकरे पांडुरंगा ॥७॥
सकळा मंगळनिधी पातकभंजना हरिजगज्जीवना परमानंदा ॥८॥
तूंचि एक सकळ आदिमध्यअंती | नित्य सुखसंपत्ति सज्जनांची ॥९॥
तूंचि माशा श्रोता तूंचि माझा वक्ता | तूंचि घेता देता प्रेमसुख ॥१०॥
विष्णुदास नामा विनवी पुरुषोत्तमा | सोडवी भवभ्रमा पासूनिया ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग