वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

बहु दिस होतो तुमचा ग

🙏 4. संत नामदेव · ABH-082810 · अभंग क्र. १५२९

1529.
बहु दिस होतो तुमचा गांवी | आता कृपा असो द्यावी ॥१॥
आम्ही जातो आपुल्या गांवा | विठोबा लोभ असो द्यावा ॥२॥
आमुचे ठायी तुझे मन | तुझे चरण आमुचे प्राण ॥३॥
आमुचे स्मरण असो द्यावे | लिखित पत्र पाठवावे ॥४॥
नामा म्हणे जी केशवा | अखंड प्रेमभाव द्यावा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग