आम्ही तुझे असो एकचि
1534.
आम्ही तुझे असो एकचि त्या बोधे | नित्य परमानंदे वोसंडित ॥१॥
विठ्ठलचि घ्यावा विठ्ठलचि गावा | विठ्ठलचि पहावा सर्वांभूती ॥२॥
या परते सुख न दिसे सर्वथा | कल्पकोटि येता गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्ती विठ्ठलाचे रूप | संकल्प विकल्प मावळले ॥४॥
