तू आकाश मी शामिका |
1540.
तू आकाश मी शामिका | तू लिंग मी साळुंखा |तू समुद्र भी चंद्रिका | स्वय दोन्ही ॥१॥
तू वृंदावन मी चिरी | तू तुळशी मी मंजिरी |तू पांवा मी मोहरी | स्वय दोन्ही ॥२॥
तू चांद मी चांदणी | तू नाग मी पचिणी |तू कृष्ण मी रुक्मिणी | स्वये दोन्ही ॥३॥
तू नदी मी थंडी | तू तारू मी सांगी |तू धनुष्य मी भातोडी | स्वये दोन्ही ॥४॥
तू वेद भी स्तविता | तू शास्त्र भी गीता |तू गंध मी अक्षता | स्वय दोन्ही ॥५॥
नामा म्हणे पुरुषोत्तमा | स्वये जडलो तुझ्या प्रेमा |मी कुट्टी तू आत्मा | स्वये दोन्ही ॥६॥
