असोनि न दिसे लौकिक व
1526.
असोनि न दिसे लौकिक वेव्हारी | ऐसा तू अंतरी लपवी मज ॥१॥
परि तुझे पायी माझे अनुसंधान | वरी प्रेमजीवन देई देवा ॥२॥
मनाचिया वृत्ति आड तू राहोनि| झेंपावती झणी कामक्रोध ॥३॥
नामा म्हणे ऐसे पाळिसी तू माते | मी जीवे तूते न विसंबे ॥४॥
