वारंवार काय विनवावे
1542.
वारंवार काय विनवावे आता समजावे चित्ता आपुलिया ॥१॥
तू काय म्हणमी कंटाळेल हाची | जाईल उगाचि उठोनिया ॥२॥
मजलागी देवा जासी चुकवोनी आणिन धरूनि तुजलागी |॥३॥
दृढ भक्तिभाव प्रेमाचा हा दोरा बांधीन सत्वर तुझे पायी ॥४॥
नामा म्हणे विठो बोल काय आता | भेटावया सर्वथा यावे बरे ॥५॥
