वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

डोळले सिणले पाहता वा

🙏 4. संत नामदेव · ABH-082817 · अभंग क्र. १५१९

1519.
डोळले सिणले पाहता वाटुली | अवस्था दाटली हृदयामाजी ॥१॥
तू माझी जननी सखिये सांगातिणी | विठ्ठले धांवोनी देई क्षेम ॥२॥
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज | क्षुधे पीडिलो मज विसरलीसी ॥३॥
तू माझी कुरंगिणी मी तुझे पाडस | गुंतले भवपाश सोडी माझा ॥४॥
मी तुझे बच्छ तू माझी गाउली | वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥५॥
नामा म्हणे माझी पुरवावी आस | पाजी तान्हुल्यास प्रेमपान्हा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग