ग्रंथाचे ते अर्थ नेण
1540.
ग्रंथाचे ते अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयी ॥१॥
नाही भेद म्हणून भलतेचि आचरे । मोकळा विचरे मनासवे ॥२॥
तुका म्हणे विषा नांव ते अमृत । पापपुण्या भीत नाही नष्ट ॥३॥
अर्थ :
दुष्ट लोकांना धार्मिक ग्रंथांचेअर्थ : माहीत नाहीत पण ते केवळ विषय भोगण्या करिता असक्त झालेले असतात. असे हे लोक 'जग एका परमात्मा पासून झाले आहे' असे म्हणतात पण त्यांच्या मनाला येईल तसे ते वागतात. विधीचे कोणतेही बंधन ते मानत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे दुष्ट लोक जसे विषाला अमृत नांव ठेवले तरी विषाचा मूळ गुणधर्म विष सोडीत नाही त्याप्रमाणे त्यांना चांगले जरी म्हटले तरी ते चांगले होत नाही त्यांना पाप आणि पुण्य समजतच नाही.
