तुझे प्रेम माझे हृदय
1535.
तुझे प्रेम माझे हृदया आवडी | चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥
कशासाठी शीण थोडक्याकारणे | काय तुज उणे होय देवा ॥२॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहळा | काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥
नामा म्हणे मज अनाथा सांभाळी | हृदयकमळी स्थिर राहे ॥४॥
