वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

येई वो कृपावंते अनाथ

🙏 4. संत नामदेव · ABH-082824 · अभंग क्र. १५२८

1528.
येई वो कृपावंते अनाथांचे नाथे | निवारी भवव्यथे पांडुरंगे ॥१॥
मी बाळक भुकाळु तू माउली कृपाळु | करी माझा सांभाळु पंढरिराया ॥२॥
माझे माहेर मे नित्य आठवे अंतरी | सखा विटेवरी पांडुरंग ॥३॥
मी देह तू चैतन्य मी क्षुधार्त तू अन्न | मी तृषार्त तू जीवन पांडुरंगा ॥४॥
मी चकोर तू चंद्र मी सरिता तू सागर | मी याचक तू दातार पांडुरंगा ॥५॥
मी धनलोभी शुभ तू पूर्ण कनक कुंभ मी मगर तू अंभ पांडुरंगा ॥६॥
मी चातक तू मेघ मी प्रवृत्ति तू बोध मी शुष्क नदी तू ओघ पांडुरंगा ॥७॥
मी दोषी तू तारक मी भूत्य तू नायक | मी प्रजा तू पाळक पांडुरंगा ॥८॥
मी पाडस तू कुरंगिणी मी अंडज तू पक्षिणी मी अपत्य तू जननी पांडुरंगा ॥९॥
मी भक्ति तू निजसोय मी ध्यान तू ध्येय | मी आडळ तू साह्य पांडुरंगा ॥१०॥
ऐसी जे जे माझी विनंती ते तुजचि लक्ष्मीपती | निज सुख सांगाती पांडुरंगा |॥११॥
शीघ्र येई वो श्रीरंगे भक्त मानस थे | प्रेमपान्हा दे गे नामदेवा ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग