वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

कृपावंत समर्थ म्हणून

🙏 4. संत नामदेव · ABH-082805 · अभंग क्र. १५२१

1521.
कृपावंत समर्थ म्हणूनि करी आत | येईन सांवरत पांडुरंगे ॥१॥
मज का विसंबली विठ्ठल माउली | तनु तृषावली जीवनेंविण ॥२॥
तू माझे जीवन नाम जनार्दन | हृदयी भरी पूर्ण प्रेमरस ॥३॥
अमृताच्या करे कांसवीच्या भरें| कुरवाळी त्वरे देह माझा ॥४॥
पूर्ण पान्हा देई निववी हृदयी | येई वो कान्हाई सांवळिये ॥५॥
नामा म्हणे पावे जीवा शीण न साहे | वेगी लवलाहे पाजी पान्हा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग