मेघापरिस उदार संत ।
1531.
मेघापरिस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥
आलिया शरण मने वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥
लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजी ॥३॥
काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव आंगासी ॥४॥
शरण एका जनार्दनी । तारिले जनी मूढ सर्व ॥५॥
