सर्वामाजी गगन आहे ।
1540.
सर्वामाजी गगन आहे ।
परि धरिताचि नये काय करु ॥१॥
तैसे नाकळेचि ते शंब्दाते ।
जेवि खदयोते रवीभेटी ॥२॥
सागरी पडताचि लवणकण ।
निवडिता भिन्न न निवडे ॥३॥
निळा म्हणे तैशा परी ।
बोलताचि वैखरी लीन तेथे ॥४॥
1540.
सर्वामाजी गगन आहे ।
परि धरिताचि नये काय करु ॥१॥
तैसे नाकळेचि ते शंब्दाते ।
जेवि खदयोते रवीभेटी ॥२॥
सागरी पडताचि लवणकण ।
निवडिता भिन्न न निवडे ॥३॥
निळा म्हणे तैशा परी ।
बोलताचि वैखरी लीन तेथे ॥४॥