वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

येई गां तू मायबापा प

🙏 3. संत तुकाराम · ABH-080321 · अभंग क्र. १५४२

1542.
येई गां तू मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काया ॥१॥
याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥धृपद॥
दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥
विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हणे हेचि आम्हा ध्यान निरंतर ॥३॥

अर्थ :
हे पंढरीच्या मायबाप तू माझ्या भेटीसाठी लवकर ये तुझ्या वाचून सर्व काही व्यर्थ शिण वाटत आहे आणि आता माझी काया म्हणजे शरीर देखील झाले क्षिण आहे. देवा माझी जात हीन आहे, माझी बुद्धिहीन आहे व माझा कर्म देखील हिन आहे त्यामुळे मी सर्व लज्जा सोडून तुला शरण आलो आहे. देवा तुम्हाला दीनानाथ, दीनबंधू, पतितपावन हि नामे शोभून दिसतात आणि तुमची ही ब्रिदे संपूर्ण जगामध्ये गाजलेली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा कटेवर कर ठेवून वीटेवर तू नीट उभा आहेस आणि आम्हाला तुझे हेच रूप आवडते व आम्ही त्याच रुपाचे नित्य ध्यान करत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग