वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

संसारषड्चक्री पडिलो

🙏 4. संत नामदेव · ABH-082479 · अभंग क्र. १५४३

1543.
संसारषड्चक्री पडिलो महाडोही | सोडवणे येई पांडुरंगा ॥१॥
दवडादवडी धांव दवडादवडी धांव | नको भक्तिभाव पाहो माझा ॥२॥
माझी चित्तवृत्ति अज्ञान हे गाई | व्याघ्रे धरिली आहे अहंकारे ॥३॥
पंचाननी मज घेतले वेदोनि नेताति काढोनि प्राण माझा ॥४॥
गजेंद्राकारणे घातली त्वा उडी तैसा लवडसवडी पावे मज ॥५॥
नामा म्हणे मज तुझाचि आधार | पोसणा डिगर जन्मोजन्मी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग