नाहीचि केले समाधान ।
1131.
नाहीचि केले समाधान ।
माझे म्हणवून क्षिती वाटे ॥१॥
आता कधी समोखाल ।
हाती धरा प्रीतीने ॥२॥
मागे बहुता सांभाळिले ।
आजी ते केले ब्रिद मिथ्या ॥३॥
निळा म्हणे निवडले खोटे ।
माझेचि वोखटे अदृष्ट ॥४॥
1131.
नाहीचि केले समाधान ।
माझे म्हणवून क्षिती वाटे ॥१॥
आता कधी समोखाल ।
हाती धरा प्रीतीने ॥२॥
मागे बहुता सांभाळिले ।
आजी ते केले ब्रिद मिथ्या ॥३॥
निळा म्हणे निवडले खोटे ।
माझेचि वोखटे अदृष्ट ॥४॥