वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

बरे होणार ते झाली मा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089450 · अभंग क्र. ११३२

1132.
बरे होणार ते झाली माझी गती ।
हळहळ किती वाढवावी ॥१॥
परी तुमच्या ब्रीदा लागला कळंक ।
दुराविल्या एक मशक मी ॥२॥
होती वाढविली कीर्ति तिही लोकी ।
ते आजी निष्टंकी वाहविली ॥३॥
म्हणती शरणांगत येणे उपेक्षिला ।
लौकिक हा झाला भला काय ॥४॥
समर्था चुकल्या भला कोणीही हांसे ।
अनाथासी नसे शंका काही ॥५॥
निळा म्हणे जागा आपुल्या उचिता ।
आम्ही तो संचिताधीन झालो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग