वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 153. श्री सोपानदेवांचे नमन

आता स्तुति पुरे पुरे

🙏 4. संत नामदेव · ABH-081561 · अभंग क्र. ११३६

1136.
आता स्तुति पुरे पुरे सोपाना | प्रेमळाचिया निधाना | संतुष्ट जालो रे वचना | एक एका तुझिया ॥१॥
तू अवतार चतुरानन | ऐसे बोलिले जगज्जीवन |तंव स्तवन करिता सोपान | तो मौन्यचि राहिला ॥२॥
सर्वोत्तम म्हणे चतुरा | महा विचाराच्या सारा | पवित्ररूपा परिकरा | सकळ 'जनासी तूंची ॥३॥
मग पाचारिली तीर्थे | जे जे तीर्थरूप सामथ्ये |म्हणे उदक द्यावे स्नानाते | सोपानदेवासी ॥४॥
गंगा जान्हवी मंदाकिनी | भोगावती 'भीमरथी तिन्ही | येती जालिया माध्यान्ही | पंचारती घेऊनिया ॥५॥
योगी सिद्ध प्रसिद्ध | नाथादि नारायण नवविध | आणि सनकादिक अगाध | नारद तुंबर पातले ॥६॥
देवी आदरिले स्तवन | ऋषी वेदघोष आरंभिले पूर्ण | सनकादिकी भाष्य जाण | हाहा हु हु गंधर्व ॥७॥
मंगळ तुरे वाजती | महावैष्णव हरिकथा करिती | नामा म्हणे पुढतो पुढती | चरणा लागे सोपान |॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग