सत्पद ते ब्रह्मा चित
1130.
सत्पद ते ब्रह्मा चित्पद ते माया । आनंद पदी जया म्हणती हरी ॥१॥
सप्त्द निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥
तत्सादिति ऐसे पैल वस्तुवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥
हरिपदप्राप्ति भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी गर्भवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐशी पदें तिनी । एका जनार्दनी तेंचि झाले ॥५॥
