व्यभिचारिणी गणिका अस
1132.
व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनी राघोबाचा ॥१॥
ऐसी ही पापिणी वाहीली विमानी । अचळ भुवनी ठेवियेली ॥धृपद॥
पतितपावन तिही लोकी ठसा । कृपाळू कोवसा अनाथांचा ॥२॥
तुका म्हणे धरा विठोबाची सोय । आणिक उपाय नेणो किती ॥३॥
अर्थ :
गणिका नावाची वैश्या म्हणजे व्याभिचारी स्त्री होती तिला पोपट खूप आवडायचा. तिने एक पोपट पाळला त्या पोपटाचे नांव तिने ‘राघोबा " असे ठेवले आणि तिच्या जीवनाच्या अंत काळी तिने त्या पोपटाला फक्त राघोबा या नावाने हाक मारली पण तिने पोपटाला रागोबा म्हटले तर देवा तू तिला जे अचल भवन ‘वैकुंठ " आहे तिथे घेऊन गेला. म्हणूनच हे हरी तुझी कीर्ती दीनानाथ, पतितपावन, अनाथांचा आश्रय म्हणून सर्वत्र पसरलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे लोकांनो तुम्ही कोणत्याही उपायानी का होईना विठोबाचे पाय धरा, असे अनेक उपाय आहेत की त्याने विठोबा रायाचे पाय धारण करता येईल त्याची गणती ही करता येणार नाही.
