वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

भक्तांचे ते साह्य कर

🙏 4. संत नामदेव · ABH-081649 · अभंग क्र. १११९

1119.
भक्तांचे ते साह्य करणे पांडुरंगा | म्हणोनि तीर्थंगंगा उगविले ॥१॥
जान्हवी मंदाकिनी भोगावती मिळुनी | दुजी हे त्रिवेणी या भूमीसी ॥२॥
निर्झर जीवन वाहती निरंतर | तेथे वटेश्‍वर उतरले ॥३॥
दुरोनि हे स्थळ दिसे मनोहर | उतरले भार वेष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे स्थळ आदि हे अनादि | येथेंची समाधी सोपानासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग