राही रखुमाई रिद्धिसि
1131.
राही रखुमाई रिद्धिसिद्धि जेथे | पडले पर्वत पक्वान्नांचे॥ १ |
बेसल्या त्या पंक्ति भोगावती तोरी | पात्रे टाकी हरि वेष्णवाला ॥२॥
विसोबा खेचर पुंडलिक संगे | वाढी पांडुरंग वैष्णवाला ॥३॥
संतसभेमाजी निवृत्ति सोपान | यथाविधी प्रमाण संपादिळे ॥४॥
रखुमाईला देवे सांगितली खूण | सोडितो पारणे सोपानदेव ॥५॥
नामा म्हणे स्वामी जातो बोलावण | आणितो सोपान भोजनासी ॥६॥
