करा माझा अंगिकार ।
1118.
करा माझा अंगिकार ।
पतीतपावन थोर ब्रीदा ॥१॥
उपेक्षिता हासती लोक ।
म्हणती सेवक जड झाले ॥२॥
मग ते तुम्हा होईल लाज ।
अंतरेल काज पुढील ही ॥३॥
निळा म्हणे अपकीर्ती अंगा ।
न ये पांडुरंगा करावे ते ॥४॥
1118.
करा माझा अंगिकार ।
पतीतपावन थोर ब्रीदा ॥१॥
उपेक्षिता हासती लोक ।
म्हणती सेवक जड झाले ॥२॥
मग ते तुम्हा होईल लाज ।
अंतरेल काज पुढील ही ॥३॥
निळा म्हणे अपकीर्ती अंगा ।
न ये पांडुरंगा करावे ते ॥४॥