एक तीन पांच मेळा पंच
1134.
एक तीन पांच मेळा पंचविसाचा । छत्तीस तत्वांचा मुळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधि शिव बोलिजे रवी ॥२॥
जीव शिव दोनी हरिरुपी तरंग । सिंधु तो अभंग नेणे हरि ॥३॥
शक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे । रज्जुवरीं भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्रक्षेत्रज्ञाते जाणताती ज्ञानीं । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
