येईल चित्तासी ते तुम
1140.
येईल चित्तासी ते तुम्हा उचित ।
आपुले संचित भोगू आम्ही ॥१॥
काय समर्थासी विनवावे रंके ।
कोण त्याचे ऐके वचन तेथे ॥२॥
थोरा घरी थोरा होतो बहुमान ।
कोण पुसे दीन याचकासी ॥३॥
निळा म्हणे आम्ही मानिला विश्वास ।
तो दिसे निरास अवघी येथे ॥४॥
