नामविण मुख सर्पाचें
1124.
नामविण मुख सर्पाचें ते बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणे । यातना भोगणें यमपुरी ॥२॥
वैष्णवांचें गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहता नाही ॥३॥
आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
एकाकार झाले जीव तेचि दोन्ही । एका जनार्दनी ऐसे केले ॥५॥
