भक्तिपंथे न चले कोणी
1135.
भक्तिपंथे न चले कोणी ।
वाट जाईल मोडोनी ॥१॥
जरि अनाथा धावणे ।
न कराल तुम्ही थोरपणे ॥२॥
आमचा जन्म वाया गेला ।
शब्द तुम्हासी लागला ॥३॥
निळा म्हणे नव्हे भली ।
पुढे वाट खोळंबली ॥४॥
1135.
भक्तिपंथे न चले कोणी ।
वाट जाईल मोडोनी ॥१॥
जरि अनाथा धावणे ।
न कराल तुम्ही थोरपणे ॥२॥
आमचा जन्म वाया गेला ।
शब्द तुम्हासी लागला ॥३॥
निळा म्हणे नव्हे भली ।
पुढे वाट खोळंबली ॥४॥