ओळखिला हरि धन्य तो स
1122.
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिद्धिसहित ॥१॥
सिद्धि लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥
काय ते करावे संदेहीं निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ॥३॥
केले कर्म झाले तेंचि भोगा आले । उपजलें मेले ऐसे किती ॥४॥
एका जनार्दनी नाही यातायाती । सुखाची विश्रांती हरिसंगे ॥५॥
हरिपाठ अभंग ४ था ला
