सोपान वटेश्वर उभे ठे
1124.
सोपान वटेश्वर उभे ठेले पुढती | पंचारत्मा होती आनंदाच्या ॥१॥
गंध आणि अक्षता वाहियेल्या सहज | देव निवृत्तिराज पूजियेळे ॥२॥
धूप आणि दीप आणिले संपूर्ण | पुजिले गगन सोपानाने ॥३॥
दाही दिशा दृष्टि अवळोकिली सारी | गगन अंकुरी डवरिले ॥४॥
चक्र सर्पाकार विजा लखलखती | ज्योति प्रकाशति रानोमाळ ॥५॥
नामा म्हणे देवा उदय जाला सकळ | सोपानदेवे मूळ दाखविले ॥६॥
