वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

जाती ब्रह्मादिक जाती

🙏 4. संत नामदेव · ABH-081647 · अभंग क्र. ११२७

1127.
जाती ब्रह्मादिक जाती चराचर | मायिक ग्यवहार ऐशा परी ॥१॥
प्रकृति पुरुषाचा मांडियेला खेळ | जाईल सकळ नाशिवंत ॥२॥
चंद्र सूर्य जाईल जाईल मृगजळ | जाती तिन्ही ताळ शून्यापोटी ॥॥३॥
होईल निरामय अवघे चराचर | ब्रह्मींचा विस्तार होईल ब्रह्मी ॥४॥
नामा म्हणे स्वामी जाताती सकळ | ब्रह्मी माया मूळ जाली कैसी |॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग