स्वहिताकारणें संगती
1129.
स्वहिताकारणें संगती साधुची । भावे भक्ति हरीची भेटी तेणे ॥१॥
हरि तेथे संत संत तेथे हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसां ते वेदार्थ नाकळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेदें नाही ऐसे सांगितले ॥४॥
वेदांची ही बीजाक्षरें हरि दोनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
