वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

भक्तिविण पशू कशासी व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085378 · अभंग क्र. ११२८

1128.
भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाही ॥१॥
काय माय गेली होती भूतापाशीं । हरि नये मुखासी अरे मुढा ॥२॥
पातके करिता पुढे आहे पुसतां । काय उत्तर देता होशील तु ॥३॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथे तुजला ॥४॥
एका जनार्दनी सांगताहे तोंडे । आहा वांचा रडे बोलताची ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग