काय नपुंसका पद्मिणीच
1136.
काय नपुंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहळें कैंचे होती ॥१॥
अधांपुढें दीप खरारी चंदन । सर्पा दुधपान करु नये ॥२॥
क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवु नये ॥३॥
खळाची संगतेरे उपयोगासी नये । आपण अपाय त्याचे संगे ॥४॥
वैष्णवीं कृपथ्य टाकिलें वाकुळीं । एका जनार्दनी तेचि भले ॥५॥
