बारा सोळाजणी हरीसी न
1140.
बारा सोळाजणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥
सहस्त्र मुखांचां वर्णिता भागला । हर्ष जया झाल तेणे सुखे ॥२॥
वेद जाणू गेला पुढे मौनावला । ते गुह्मा तुजला प्राप्त कैंचें ॥३॥
पूर्व सुकृताचा पुर्ण अभ्यासाचा । दास सदगुरुचा तोचि जाणे ॥४॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
