नाकळें ते कळे कळे ते
1131.
नाकळें ते कळे कळे ते नाकळे । वळे ते नावळे गुरुविण ॥१॥
निर्गुणीं पावले सगुणीं भजता । विकल्प धरिता जिव्हा झडे ॥२॥
बहुरुपी धरी संन्याशाचा वेश । पाहोन तयास धन देती ॥३॥
संन्याशाल नाही बहुरुपीं याला । सगुणीं भजला तेथे पावे ॥४॥
अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी । एका जनार्दनी ओळखिलें ॥५॥
