जया जो वाटा भागा आला
1124.
जया जो वाटा भागा आला ।
पाहिजे केला जतन तोचि ॥१॥
आम्ही कराव्या पापराशी ।
निरसन तयासी तुम्ही कीजे ॥२॥
लोहे न संडिता लोहपणा ।
परिसे तत्क्षणा पालटावे ॥३॥
निळा म्हणे अंधार निशी ।
रवी त्या प्रकाशी निजतेजे ॥४॥
1124.
जया जो वाटा भागा आला ।
पाहिजे केला जतन तोचि ॥१॥
आम्ही कराव्या पापराशी ।
निरसन तयासी तुम्ही कीजे ॥२॥
लोहे न संडिता लोहपणा ।
परिसे तत्क्षणा पालटावे ॥३॥
निळा म्हणे अंधार निशी ।
रवी त्या प्रकाशी निजतेजे ॥४॥