वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

कळवळी मन नाही देहभान

🙏 4. संत नामदेव · ABH-081634 · अभंग क्र. ११३४

1134.
कळवळी मन नाही देहभान |वटेश्वर सोपान सोंवळे जाले |॥१॥
संत साधुजन होत कासाविसी | आले समाधीपाशी तांतडीने | २ ॥
समाधीभोंवते कुंकुमाचे सडे | पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी मृगछाला दिसताती लाल | दर्भ आणि फुले समर्पिली ॥४॥
दुर्वा आणि बेल टाकिले मोकळे | साहित्य सकळ सर्मपिले ॥५॥
निवृत्ति पांडुरंग बैसले येऊन | नमन सोपान करितसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग