वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

भाव भक्ति विलासिया ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089443 · अभंग क्र. ११३६

1136.
भाव भक्ति विलासिया ।
परिसा विनंती पंढरीराया ॥१॥
आम्हा दासा सांभाळिजे ।
देउनी प्रेम गौरविजे ॥२॥
जैसी तुमची आहे ख्याती ।
तैसीचि चालो दया जी पुढती ॥३॥
नाही तरि होईल हांसे ।
लोकी ब्रीद लटिके दिसे ॥४॥
तुम्ही आम्हा उपेक्षिले ।
तरी हीनत्व सांगा कोणा आले ॥५॥
निळा म्हणे पुढीला चाली ।
वाट पाहिजे रक्षिली ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग