देव म्हणे नाम्या मार
1118.
देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा | जावे सासवडा उत्सवासी ॥१॥
सोपानासी आम्ही दिधले वचन | चेला अवघेजण समुदाय |॥२॥
आळंकापुरीची यात्रा केली सांग | मग पांडुरंग सिद्ध जाले |॥३॥
दुरोनि पताका दिसती मनोहर | उठावले भार वैष्णवांचे ॥४॥
निवृत्ति मुक्ताई घेतला सोपान | जातो नारायण कऱ्हेतीरी ॥५॥
नामा म्हणे देव गंधर्व सुरगण | चालिले सोपान समाधीसी ॥६॥
