हरिनामामृत सेवी सावक
1127.
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भुस दृष्टीपुढें ॥१॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरी । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणशी तीर्थ क्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैंचा ॥३॥
एका तासामाजीं कोटी वेळां सृष्टी । होती जाती दृष्टी पाहे तोची ॥४॥
एका जानर्दनीं ऐसे किती झाले । हरिनाम सेविले तोचि एक ॥५॥
